मुहूर्त ठरला...आणि प्रतीक्षा संपली...  28 ऑक्टोबर,सोमवार रोजी अमोल शिंदे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शंखनाद करणार

येथील भारतीय जनता पार्टीचे विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी करण्याची घोषणा केली असून विधानसभा निवडणूक लढण्यावर शिक्कामोर्तब केले आहे.मागील विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून अत्यंत कमी मताने पराभूत झालेले अमोल शिंदे यांनी मागील विधानसभा निवडणुकीनंतर गेल्या पाच वर्षापासून न थांबता सतत मतदारसंघातील जनतेच्या सुख-दुःखात उभे राहत आपला जनसंपर्क अजून जोमाने वाढवला आहे.
 

 
politics

भाजपा व्यवस्थापन समितीची जळगाव शहर विधानसभा निवडणुकीची 109 कार्यकर्त्यांची जम्बो यादी जाहीर

जळगाव शहरातून. आ सुरेश भोळे (राजु मामा )एक लाखाच्या मताधिक्याने विजयी होणार.
ना. गिरीशभाऊ महाजन नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा घोषित झाले असून, दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात व जळगाव जिल्ह्यात भाजपा निवडणुकीच्या जय्यत तयारीला लागलेली आहे. इतर पक्षाच्या मानाने भाजपाची संघटना व संघटनात्मक कार्य व निवडणूक यंत्रणा ही ईतर पक्षाच्या मानाने अव्वल त्याच दृष्टिकोनातून आज दिनांक २५ ऑक्टोबर रोजी भाजपा कार्यालय जी एम फाउंडेशन येथे दुपारी 1: वाजता महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली

 

Social

मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड ने
मुंबईत जैन इरिगेशन परिवाराचा झाला गौरव

जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.ने शेती, शेतकरी, सिंचन आणि पर्यावरणात जागतिक पातळीवरील केलेल्या अलौकिक कार्यास अधोरेखित करत बार्कलेज प्रायव्हेट क्लायंट हुरुन इंडिया तर्फे दिला जाणारा प्रतिष्ठित मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस अवॉर्ड ने जैन इरिगेशन परिवाराचा गौरव करण्यात आला. काल मुंबई येथे हॉटेल फोर सिझन्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, डॉ. भावना जैन, अभंग जैन यांनी स्वीकारला.
 

Sports

नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलच्या साची पाटील ला सुवर्ण पदक

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा कार्यालय नाशिक आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने सिन्नर येथे नाशिक विभागस्तरीय शालेय तायक्वांडो स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. यामध्ये अनुभूती निवासी स्कूलची इयत्ता ८ वीची विद्यार्थीनी साची पाटील हिने १४ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या ३२ ते ३५ वजनगटात भाग घेतला. यामध्ये तीन फेरांमध्ये प्रतिस्पर्धकांनी साची पाटील हिने एकतर्फे मात दिली. जळगाव मनपा ३२-१०, नाशिक मनपा २६-२०, नाशिक ग्रामीण २४-२० ह्यांच्यावर तिने विजय मिळविला. या विजयामुळे तिला सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तिची निवड पुणे बालेवाडी येथे दि.२८ ते ३१ ऑक्टोबर ला होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला प्रशिक्षक जयेश बाविस्कर (एनआयएस) यांनी मार्गदर्शन केले.

Sports

राज्य खो खो स्पर्धेसाठी जळगांव जिल्हाच्या कुमार / मुली खो-खो संघाच्या कर्णधारपदी चैतन्य पोळ (कुमार) व नंदिनी पाटील (मुली) यांची निवड...!!!

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनने सन 2024-25 या वर्षाची कुमार। मुली विभागाची 50 वी कुमार / मुली राज्य अजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा धाराशिव (उस्मानाबाद) जिल्हा येथे संपन्न होत आहे या स्पर्धेसाठी जळगांव जिल्हयाचा कुमार। मुन्त्री संघ सहभागी होणार आहे,या संघाची निवड समिती सदस्य म्हणून दत्ता महाजन, दिलिप चौधरी, विशाल पाटील, गोपाळ पवार, हर्षल बेडीस्कर, राहुल पोळ यांनी काम पहिले,या संधास संघटनेचे पदाधिकारी माजी आ. प्रा. चंद्रकांत सोनवणे, प्रा.डी.डी बच्छाव, गणपतराव पोळ, सौ विद्या कलंत्री, उदय पाटील,सुनिल समदाणी, प्रा श्रीकृष्ण बिलोरकर, जयांशू पोळ, नामदेव सोनवणे, अनंता समदाणी यांनी स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.....
 

Politics

मी दहा वर्षात मतदारसंघाचा केलेला विकासावर तुम्ही दाखवलेला विश्वासामुळे

आज नामांकन अर्ज भरण्यासाठी आपण केलेली रेकार्डब्रेक गर्दि ही आगामी विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली असून आता पुढच्या टप्प्यात जलसंधारण व रोजगार निर्मितीच्या विषयावर काम करणे माझा मुख्य अंजेडा रहाणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर आप्पा पाटील यांनी केले.

Politics

 

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तब्बल १२८ कोटींचे सोने जप्त, सहकारनगर भागात पोलिसांची कारवाई

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शहर, परिसरात गस्त वाढविण्यात आली आहे. पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत सहकारनगर भागातून तब्बल १२८ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले.

Politics

 माजी उपमहापौर अश्विन सोनवणे बंडखोरीच्या तयारीत

पक्षात त्रास झाला , गिरीश महाजनांच्या टप्प्यात अश्विन सोनवणे बंडखोरीच्या तयारीत

Other

‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’

लोकसत्ताच्या प्रेक्षकांना सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे विचार ऐकता येतील.

Politics

भाजपा उमेदवारांचे एबी फॉर्म घेऊन उदय सामंत मनोज जरांगेंना भेटले; आंतरवालीत काय शिजतंय? सामंत म्हणाले

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून अनेक पक्षांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरून प्रचाराला सुरुवात केली आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर केला जाईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षांचे नेते, कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत.


Scroll to Top