Recent News

चोपड्यात पहिल्याच दिवशी 28 नामनिर्देशनपत्रांची विक्री

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी चोपडा विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी 28 नामनिर्देशन पत्रांची विक्री करण्यात आली आहे. तेरा उमेदवार आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींनी हे 28 अर्ज वितरीत करण्यात आले आहेत .
प्रशासनाच्या वतीने नामनिर्देशन पत्रांच्या विक्रीसाठी आणि स्वीकृतीसाठी तयारी पूर्ण केली असून उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना कमीत कमी वेळात नामनिर्देशन पत्र दाखल करता यावे अशी यंत्रणा राबविण्यात आली आहे..


जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ग्रामविकास अपवर मिळणार प्रशिक्षण; संबंधितांनी अप डाउनलोड करावे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

जळगाव दि. 17 ( जिमाका ) जळगाव जिल्ह्यातील विधानसभा निवडणुका बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना ग्रामविकास अँपच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार असून संबंधितांनी bit.ly/GramVikas हे अप डाउनलोड करावे असे निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत. जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालयाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता मतदान पथकात नियुक्त करावयाच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणासाठी ग्रामविकास विभागामार्फत ग्राम विकास अॅप विकसीत केले आहे. सदर अॅपवर निवडणूक विषयक प्रशिक्षणाशी संबंधीत सर्व माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सदर अॅप डाऊनलोड करण्यासाठी bit.ly/GramVikas ही लिंक दिलेली आहे. निवडणुकीत मतदान पथकातील सर्व अधिकारी,कर्मचारी यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, आपण या लिंकवर क्लिक करून गूगल प्ले स्टोअर मधून "ग्रामविकास अॅप डाउनलोड करावे व सदर अॅपवर उपलब्ध करुन दिलेले निवडणूक विषयक प्रशिक्षण साहित्य डाऊनलोड करुन घ्यावे. निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अॅपच्या नोंदणीसाठी https://bit.ly/RegistrationHelp Video या लिंक मध्ये नमूद व्हिडिओ मध्ये कार्यवाहीचे सर्व टप्पे नमूद करण्यात आले आहे, त्याचे अवलोकन करुन कार्यवाही करावी. या संदर्भातील शुक्रवार, दि. 22 ऑक्टोबर, 2024 पर्यंत आपली नोंदणी पूर्ण करावी असे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
आपल्याला नोंदणीमध्ये कोणतीही समस्या असल्यास https://bit.ly/WhatsappHelpGroup या व्हॉट्सअॅप समूहात पुढील नमूद लिंकवर क्लीक करुन सामील व्हावे असे सांगण्यात आले आहे.

Politics 22 october, 2024  

उच्च न्यायालय आणि खंडपीठात विशेष लोकअदालतीचे आयोजन

जळगाव दि. 18 ( जिमाका ) उच्च न्यायालयातील प्रलंबीत खटले निकाली काढण्यासाठी उच्च मुंबई आणि त्यांचे खंडपीठ नागपुर व औरंगाबाद येथे ३० नोव्हेंबर, २०२४ आणि १ डिसेंबर, २०२४ या कालावधीत विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री. एस.पी. सैय्यद सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर जळगाव यांनी दिली आहे.
जळगाव जिल्हयातील ज्या पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालयातील प्रलंबीत आहेत व ही प्रकरणे तडजोडीने मिटावीत अशी ज्यांची इच्छा आहे. अशा पक्षकारांची प्रकरणे या विशेष लोकअदालतीत ठेवता येणार आहे. त्यासाठी श्री. एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्व बोलणी बैठक जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव येथे घेण्यात येणार आहे. संबधीत पक्षकार प्रत्यक्ष अथवा आभासी पध्दतीने यात सहभागी होउ शकतात. तरी अशा पक्षकारांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन एम.क्यु.एस, एम शेख अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
 22 oct 2024 



शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात महर्षी वाल्मिकी जयंती साजरी

जळगाव (प्रतिनिधी) : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महर्षी वाल्मिकी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकुर यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.
यावेळी उपअधिष्ठाता डॉ. मारुती पोटे, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. राजकुमार सूर्यवंशी, डॉ. हितेश अडचित्रे, डॉ. दीपक शेजवळ, प्रशासकीय अधिकारी संजय चौधरी, दिलीप मोराणकर, विजय पाटील, अनिल कापुरे, नरेंद्र वाघ, निलेश बारी, प्रदीप जयस्वाल, संजय शेळके, ज्ञानेश्वर पाटील, प्रदीप पाडवी, साहेबराव कुडमेथे, राजू सपकाळे, लीलाधर कोळी, मोहन पाटील, विजय बावस्कर आदी उपस्थित होते.


लवकर निदान झाल्यास वेळेवर उपचार शक्य होतात : डॉ. गिरीश ठाकूर

स्तन कर्करोग जनजागृतीविषयी 'जीएमसी'त पथनाट्य सादर

स्तन कर्करोग ही महिलांमध्ये आढळणारी सर्वात सामान्य प्रकारची कर्करोगाची समस्या आहे. त्याचा सुरुवातीला निदान झाल्यास उपचार सोपे होऊ शकतात. म्हणून स्तन कर्करोगाची लक्षणे ओळखणे आणि नियमित तपासण्या करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर यांनी केले.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या शल्यचिकित्सा विभागातर्फे स्तन कर्करोग जनजागृती महिन्यानिमित्त विशेष उपक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. त्यातून उपस्थित रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, शल्यचिकित्सा विभाग प्रमुख तथा उप अधिष्ठाता डॉ. मारोती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, उप अधिष्ठाता डॉ. रमेश वासनिक, डॉ. योगिता बावस्कर, डॉ. विश्वनाथ पुजारी उपस्थित होते. सुरुवातीला कार्यक्रमाचे नोडल अधिकारी सहयोगी प्रा. डॉ. संगीता गावित यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती सांगितली. यानंतर शल्यचिकित्सा विभागाच्या निवासी विद्यार्थ्यांनी स्तन कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक नाटिका सादर केली.
नाटिकेतून, स्तन कर्करोगविषयी संदेश देण्यात आला. स्तन कर्करोगाची मुख्य लक्षणे हि स्तनात गाठ निर्माण होणे, त्वचेचा रंग बदलणे, स्तनात वेदना किंवा अस्वस्थता, स्तनातून स्त्राव येणे असे आहेत. विभागाच्या मदतीने ओपीडी क्रमांक ११६ येथे सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत आणि तपासणीसाठी सर्वतोपरी मार्गदर्शन उपलब्ध आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे. सूत्रसंचालन डॉ. सुनील गुट्टे यांनी केले. आभार डॉ. शर्वरी कदम यांनी मानले. कार्यक्रमासाठी विभागातील प्राध्यापकांसह डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. अभिषेक उंबरे आदी विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.

22 oct, 2024

भाजपची 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर

जळगाव जिल्ह्यात कोणाला संधी?
 

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत भाजपने ९९ उमेदवारांना संधी दिली आहे. यात 13 महिलांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया अशोक चव्हाण यांनाही पक्षाकडून संधी देण्यात आली आहे. श्रीजया चव्हाण यांना भोकर मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे.
भाजपच्या या महिला उमेदवारांमध्ये ,श्रीयजा अशोक चव्हाण – भोकर, मंदा विजय म्हात्रे – बेलापूर,मनीषा अशोक चौधरी – दहिसर,गोरेगांव – विद्या ठाकूर,माधुरी सतीश मिसाळ – पर्वती,अनराधाताई अतुल चव्हाण – फुलंबरी,सीमाताई महेश हिरे – नाशिक पश्चिम,सुलभा गायकवाड – कल्याण पूर्व, मोनिका राजीव राजले – शेगांव,प्रतिभा पचपुते – श्रीगोंडा,नमिता मुंदडा – कैज,

भाजपची पहिली उमेदवार यादी, नागपूर पश्चिम – देवेंद्र फडणवीस, नागपूर दक्षिण – मोहन मते , नागपूर पूर्व – कृष्ण खोपडे, कामठी -चंद्रशेखर बावनकुळे, चिखली -श्वेता महाले, खामगाव – आकाश फुंडकर, नंदूरबार- विजयकुमार गावीत,धुळे शहर -अनुप अग्रवाल, सिंदखेडा – जयकुमार रावल, शिरपूर – काशीराम पावरा, रावेर – अमोल जावले, भुसावळ – संजय सावकारे, जळगाव शहर – सुरेश भोळे, चाळीसगाव – मंगेश चव्हाण, जामनेर -गिरीश महाजन, जळगाव (जामोद) – संजय कुटे, देवली – राजेश बकाने, अमगांव – संजय पुरम, आर्मोली – कृष्णा गजबे, किनवट – भीमराव केरम, अकोला पूर्व – रणधीर सावरकर, धामगाव रेल्वे – प्रताप अडसद, अचलपूर – प्रवीण तायडे, हिंगणघाट – समीर कुणावार, वर्धा – पंकज भोयर, हिंगना – समीर मेघे, तिरोरा – विजय रहांगडाले, गोंदिया – विनोद अग्रवाल, बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चिमूर – बंटी भांगडिया, वाणी – संजीवरेड्डी बोडकुरवार, रालेगाव – अशोक उडके, यवतमाळ – मदन येरवर, महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार, शहादा – राजेश पाडवी, भोकर – क्षीजया चव्हाण, नायगाव – राजेश पवार, मुखेड – तुषार राठोड, हिंगोली – तानाजी मुटकुले, जिंतूर – मेघना बोर्डीकर, परतूर – बबनराव लोणीकर, बदनापूर -नारायण कुचे, भोकरदन -संतोष दानवेm फुलंब्री – अनुराधा चव्हाण, औरंगाबाद पूर्व – अतुल सावे, गंगापूर – प्रशांत बंब, बगलान – दिलीप बोरसे, निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर, औसा – अभिमन्यू पवार, तुळजापूर – राणा जगजितसिंह पाटील, सोलापूर शहर उत्तर – विजयकुमार देशमुख, अक्कलकोट – सचिन कल्याणशेट्टी, सोलापूर दक्षिण – सुभाष देशमुख, मान -जयकुमार गोरे, कराड दक्षिण – अतुल भोसले, सातारा – शिवेंद्रराजे भोसले, कणकवली – नितेश राणे, कोल्हापूर दक्षिण – अमल महाडिक, इचलकरंजी – राहुल आवाडे, मिरज – सुरेश खाडे, सांगली – सुधीर गाडगीळ, चंदवड – राहुल अहेर, नाशिक पुर्व – राहुल ढिकाले, नाशिक पश्चिम – सीमाताई हिरे, नालासोपारा – राजन नाईक, भिवंडी पश्चिम – महेश चौघुले, मुरबाड – किसन कथोरे, कल्याम पूर्व – सुलभा गायकवाड, डोंबिवली – रवींद्र चव्हाण, ठाणे – संजय केळकर, ऐरोली – गणेश नाईक, बेलापूर – मंदा म्हात्रे,दहिसर – मनीषा चौधरी, मुलुंड – मिहिर कोटेचा, कांदिवली पूर्व – अतुल भातखलकर, चारकोप – योगेश सागर, मालाड पश्चिम – विनोद शेलार, गोरेगाव – विद्या ठाकूर, अंधेरी पश्चिम – अमित साटम, विले पार्ले – पराग अलवणी, घाटकोपर पश्चिम – राम कदम, वांद्रे पश्चिम – आशिष शेलार, सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन, वडाळा – कालिदास कोळंबकर, मलबार हिल – मंगलप्रभात लोढा , कुलाबा – राहुल नार्वेकर, पनवेल – प्रशांत ठाकूर, उरन – महेश बाल्दी , दौंड- राहुल कुल, चिंचवड – शंकर जगताप, भोसरी -महेश लांडगे, शिवाजीनगर – सिद्धार्थ शिरोले, कोथरुड – चंद्रकांत पाटील, पर्वती – माधुरी मिसाळ, शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील, शेवगाव – मोनिका राजले
राहुरी शिवाजीराव कर्डिले, श्रीगोंदा – प्रतिभा पाचपुते, कर्जत जामखेड – राम शिंदे, केज – नमिता मुंदडा

 22 oct, 2024  


धरणगाव तालुक्यातील पाळधी येथून जवळच असलेल्या चांदसर येथे शेतात ट्रॅक्टरला रोटव्हेटर जोडत असताना ते अचानक सुरू झाल्याने एकाचा त्यात पाय अडकून मृत्यू झाल्याची घटना घडली.

 चांदसर येथे रमेश सुका कोळी हे शेतीची कामे करून आपल्यासह कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. आज सकाळी ९ ते १० वाजेदरम्यान कृषी महाविद्यालय परिसरातील शेतात ते काम करत होते. शेतातील कामासाठी ट्रॅक्टरला रोटाव्हेटर जोडण्याचे काम सुरू होते. या वेळी अचानक ते सुरू झाले. यात रमेश कोळी यांचा त्यात पाय अडकल्याने त्यांचा पायाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. या घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर या घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलिस चौकीचे पी.एस.आय. मधुकर उंबरे, विठ्ठल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या वेळी जखमी अवस्थेत असलेल्या रमेश कोळी यांना खासगी वाहनातून जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल दुग्गड यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या वेळी त्यांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर चांदसर येथे दुपारी ४ वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

21 oct, 2024 

मोटरसायकल चोरी प्रकरणी कठोर येथील चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. पाच वर्षांपूर्वी मोटारसायल चोरी प्रकरणात तालुका पोलीस ठाण्यात व पुणे येथे गुन्हा दाखल आहे.

जळगाव मधील शनिपेठ येथील रहिवाशी प्रशांत सानप यांची सन २०१८ साली सीडी डिलक्स मोटर सायकल (एमएच 19 बीई 6230) आव्हाणे शिवारातून चोरटयांनी चोरुन नेली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोटर सायकल चोरी प्रकरणात पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीनुसार जिवन गोकुळ शिंदे (रा. कठोरा ता . जळगाव ) याच्याकडे चोरीच्या दोन मोटार सायकली असल्याचे समजले.
यावरुन कठोरा येथुन जिवन शिंदे यास ताब्यात घेण्यात आले. यावेळी त्याला त्याच्या जवळ असलेल्या दोन्ही मोटार सायकलबाबत चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान, पोलिसांनी या दोन्ही मोटार सायकलींची अधिक माहिती काढली असतात सीडी डीलक्स गाडी ही शनी पेठ येथील प्रशांत सानप यांच्या मालकीची असल्याचे उघड झाले.
त्याचेकडे असलेल्या दोन्ही मोटार सायकलींबाबत विचारपुस करता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने दोन्ही मोटार सायकलींची माहीती काढली असता सीडी डीलक्स मोटर सायकल क्रमांक एमएच 19 बीई 6230 ही प्रशांत सानप रा. शनीपेठ जळगाव यांच्या मालकिची आढळून आली. यासोबत अजुन एक एमएच 12 जीएच 0897 या क्रमांकाची सीडी डीलक्स मोटर सायकल जीवन शिंदे यांच्याकडून हस्तगत करण्यात आली. ही मोटर सायकल ही सुरेश वासुदेव इंगळे रा दशरथनगर विश्रांतवाडी पुणे यांच्या नावावर तपासात निष्पन्न झाले आहे.
या दोन्ही मोटार सायकलींबाबत जळगाव तालुका पोलिस स्टेशनला एक गुन्हा व एक पुणे येथे दाखल आहे. आरोपी जिवन गोकुळ शिंदे यास जळगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात मोटार सायकल सह देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनी दिपक जगदाळे, पोहेका, गणेश शिरसाळे, जमीर शेख, किशोर पाटील, पोका नाना तायडे, गणेश ठाकरे, नितीन ठाकरे, किरण पाटील विकास सातदीवे, योगेश बारी यांनी केली आहे.

21 oct, 2024

 विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने अपघात

पारोळा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी उलटली. त्यात कार मधील दोघांचा मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.
राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८) व निलेश सुरेश पाटील (वय २३) रा. रा. तरवाडे जि. धुळे असे मृतांची नावे आहेत. पारोळा कडून धुळ्याकडे जाणारी स्विफ्ट कारमध्ये निलेश पाटील, गोविंद भास्कर राडोड (वय २४) रा. तरवाडे, राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता. पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात होते. तेव्हा पारोळा शहरानजीक असलेल्या विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार कार रोडच्या कडेला चार वेळा उलटून खाऊन पाचशे फुटावर थांबली. त्यात राहुल पाटील याचा जागीच मृत्यू झाला. तर निलेश पाटील याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे व गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची १०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील गोविंदा राठोड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

जळगाव येथील राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रीयेसाठी मुदतवाढ

जळगाव दि. 21 ( जिमाका ) इयत्ता १०वी १२वी पुरवणी परीक्षेचा निकाल नुकताच लागला आहे. या अनुषंगाने राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण (महिला) या संस्थेतील विविध व्यवसायाच्या शिल्लक जागांसाठी प्रवेश प्रक्रीयेत मुदवाढ देण्यात आली आहे. दि.१९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत मुदवाढ मिळाली असून आता उमेदवार राणी लक्ष्मीबाई शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थेत अर्ज भरुन प्रवेश घेऊ शकतात. प्रवेश प्रक्रिया सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.३० पर्यंत कार्यालयीन वेळेत सुरु झाली आहे.
सदरच्या समुपदेशन फेरीसाठी दिनांक ३० ऑक्टोबर पर्यंतची मुदतवाढ देण्यात आल्याचे वरीष्ठ कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे. दिनांक २४ ऑक्टोबर ते ३० ऑक्टोबर या कालावधीत एकत्रित समुपदेशन फेरीमध्ये पूर्वी राहीलेले उमेदवार व नव्याने अर्ज सादर केलेले उमेदवार यांना प्रवेश घेता येणार आहे. जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला प्रवेश अर्ज भरण्यासाठी व निश्चीतसाठी संस्थेत संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले
आहे.